Categories: अधिक

पोस्टाच्या ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार ‘इतका’ फायदा

15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं (पीपीएफ)-

पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.9 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना-

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.4 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.

वरिष्ठ नागरिक बचत खाते (एससीएसएस)

60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.6 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 7.9 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्यात वाढ करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिसचं टाइमडिपॉझिट अकाऊंट (Post Office Time Deposit Account (TD)-

या योजनेत पैसे यासाठी जमा करावेत की सध्या या योजनेत जास्तीत जास्त 6.9 ते 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. जर या व्याजदरावर एक लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांनंतर 4.6 लाख रुपये रिटर्न मिळेल. या रकमेतून म्हणजेच एक लाख रुपये कमी केल्यास 20 वर्षांनंतर एकूण 3.6 लाख रुपये निव्वळ व्याज मिळेल. 200 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते असून, जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात कोणतीही मर्यादा नाही. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago