जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK

सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील म्हाडाच्या इमारतीत तसेच कंबर तलवा शेजारील केटरिंग कॉलेजच्या इमारतीत क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

वालचंद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दोन इमारती जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. येथे 330 लोकांची व्यवस्था होऊ शकते. येथे लोकांना राहण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. येथे महापालिकेमार्फत साफसफाई व्यवस्था करण्यात येते आहे. म्हाडाची जुळे सोलापूर येथील 70 प्लॅटची इमारतही क्वारंटाइन सेंटरसाठी घेण्यात आली आहे. एका फ्लॅटमध्ये पाच संशयितांना ठेवले जाऊ शकते, असे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले.

श्री. शंभरकर आणि श्री. शिवशंकर यांनी या तिन्ही इमारतींची पाहणी केली. सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago