एन. के. किड्स स्कूल मध्ये गोवर रूबेला विषयी मार्गदर्शन

0
4

(वेब/टीम)

ओम फौंडेशन संचलित बाळे येथील एन. के. किडस स्कूल येथे गोवर रूबेला या लसीकरणाविषयी मार्गदर्शन पालक सभा व दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

व्यासपीठावर बाळे येथील आरोग्य केंद्रातील परिचारिका सांगिता माने, समाजसेवक राजाभाऊ आलुरे, संस्था संचालक विकास कस्तुरे, अंजली गुरव, पालक प्रतिनिधी आनंद चौगुले, निलम पाटील, संगिता सोनटकले, रावणपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना संगिता माने म्हणाल्या की, केंद्र सरकारने गोवर आणि रूबेला आजारांना प्रतिबंध करण्यासाठी 9 महिने ते 15 वर्षे पर्यंतच्या मुलामुलींना लसीकरण करण्याची मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यात 27 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे 11 लाख 65 हजार 239 मुलामुलींना लस दिली जाणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असल्याचेही माने यांनी सांगितले.

तसेच स्कूलमधील 2 री पालक सभा व दिपावली निमित्त दिवाळी उत्सव मुलांना खाऊ व आकाश कंदिल वाटप करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका त्रिशा पवार यांनी केले. ज्योती गवसने, अश्‍विनी शिंगण यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here