Categories: राजकीय

महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकास घेतले ताब्यात

(वेब/टीम)
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी एका युवकाने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला महापालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवारातील बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा विनायक गायकवाड (रा. शहा हौसिंग सोसायटी) हा रिपब्लिकन सेनेचा जिल्हा सचिव आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्यावर उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी होऊन फाईल आयुक्तांकडे गेली होती.
गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने साळुंके यांच्यावर कारवाईची आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिफारस करावी, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ही फाईल हलली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी ८ आॅक्टोबर रोजी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात ३ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही महापालिका आयुक्त कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली नाही. या प्रकारामुळे मनपा आवारात एकच खळबळ उडाली होती.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

2 hours ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

2 hours ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

12 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

21 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

22 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago