काशीपीठाच्या शतमानोत्सवात सोलापूरकर बजावणार महत्त्वपूर्ण सेवा

सोलापूर : काशी पीठात दिनांक 15 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2020 पर्यंत गुरुकुल शतमानोत्सव साजरा होणार आहे. या समारंभात संपूर्ण भारत व परदेशातील लाखो भाविक सहभागी होणार आहेत. हा शतमानोत्सव यशस्वी होण्यासाठी सोलापूरकर महत्त्वपूर्ण सेवा बजावणार असल्याचे अभिवचन काशी जगद्गुरुंना देण्यात आले.
काशी पीठाच्या शतमानोत्सव कार्यक्रमाची नियोजन बैठक होटगी मठ अक्कलकोट रोड येथे घेण्यात आली. याप्रसंगी काशी जगद्गुरु डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, बृहन्मठ होटगीचे मठाधीश डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी, मैंदर्गी मठाचे मठाधीश ष.ब्र. नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सिद्धेश्वर देवस्थानचे पंच सिद्धेश्वर बमणी, सुभाष मुनाळे, बाळासाहेब भोगडे, महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे, माजी नगरसेवक केदार उंबरजे, युवक कॉग्रेस सेवादलचे सुदीप चाकोते, धानम्मा देवी ट्रस्ट गुड्डापूरचे संचालक सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, सिद्धेश्वर बँकेचे व्हा. चेअरमन नरेंद्र गंभीरे, बसवराज दुलंगे, वीरशैव सेवा संघाचे सिद्धारूढ निंबाळे, सामाजिक कार्यकर्ते बसवराज सावळगी, बाबुराव मैंदर्गिकर, जनता बँकेचे संचालक महेश अंदेली, जंगम समाज युवक संघटनेचे अध्यक्ष योगेश चडचणकर आदी उपस्थित होते.
यावेळी काशी जगद्गुरूंनी शतमानोत्सव हा कार्यक्रम म्हणजे वीरशैवांचा महाकुंभ ठरणार असल्याचे सांगत 40 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारल्याचे जगद्गुरूंनी सांगितले.
शतमानोत्सवानिमित्त आयोजित पहिल्याच नियोजन बैठकीत भक्तगणांनी सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार तर केलाच. शिवाय मदतीसाठीही अनेकांचे हात पुढे सरसावले. राजशेखर शिवदारे यांच्या पुढाकारातून काशी पीठाच्या दासोह विभागाला चपाती मशीन देण्याचे सिद्धेश्वर बमणी यांनी जाहीर केले. रायगोंडा हत्ताळे यांनी २५ हजारांचा धनादेश दिला. सिद्धेश्वर हिरेमठ यांनी पत्रिका व पुस्तिका यासाठी 61 हजार रुपयांची देणगी दिली.


काशी येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी लवकरच नोंदणी केंद्र सुरुवात करण्यात येणार असून प्रवास, निवास व भोजन व्यवस्था याचेही नियोजन करण्यात येणार आहे.
बैठकीचे प्रास्ताविक डॉ अनिल सर्जे यांनी केले. सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले तर आभार प्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी केले. बैठकीच्या यशस्वितेसाठी बृहन्मठ होटगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे…

9 hours ago

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

10 hours ago

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील…

1 day ago

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे…

2 days ago

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट!

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी…

2 days ago

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील…

2 days ago