‘शिवजयंती’निमित्त तातडीने सुविधा पुरवाव्यात: महापौर यन्नम

MH13NEWS Network

सोलापुरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच सोबत शहरातील विविध मंडळांच्या अडीअडचणी जाणून घेऊन महापालिकेच्यावतीने सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशा सूचना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापौर कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापुरात साजऱ्या होणाऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं असतं.महापालिकेचे अधिकारी या कडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात असा आक्षेप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावर अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत महापौर यन्नम यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात कोणत्याच प्रकारची दिरंगाई करू नका, वेळेवर कामे पूर्ण करा अशा सूचना दिल्या.

यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण काढण्यात यावे,पुतळा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, या परिसरात विद्युत रोषणाई करावी, तसेच पाळणा कार्यक्रमावेळी सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, यावेळी उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी महापालिकेच्या परिवहन बसेसची सुविधा करावी, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, उत्सवानिमित्त लावण्यात येणार्‍या होर्डिंग्जना मनपाने तातडीने परवानगी द्यावी,अशा मागण्या केल्या. यावर या सर्व बाबींची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवजन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपमहापौर पद्माकर नाना काळे, दिलीप कोल्हे, माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, दास शेळके, राजन जाधव, भाऊ रोडगे, गणेश डोंगरे, विजय पुकाळे श्रीकांत घाडगे, शेखर फंड,सुनील  रसाळेसह महिला उपस्थित होत्या.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago