दिवाळीआधी मानधन न दिल्यास ‘जनआंदोलन’ आ.देशमुख

MH13 NEWS Network

दिवाळी जवळ आली असून अजूनपर्यंत जिल्ह्यातील दिव्यांग , निराधार , वृद्ध, गोरगरीब ,नागरिक व  महिला यांना  देण्यात येणारे मानधन राज्य सरकारकडून  अजूनपर्यंत देण्यात आले नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत असूनही राज्य सरकार याकडे लक्ष न देता या विषयाकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी या सर्वांचे मानधन द्यावे अन्यथा राज्य सरकारविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुंबई मंत्रालय येथे संपर्क करून सदर समस्या कळवल्या यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच मानधन दिले जाईल असे आश्वासन दिले  आहे. राज्य सरकारच्या या कृतीचा आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर निषेध केला असून,  महाविकास आघाडी सरकार हे गोरगरिबांच्या जीवावर उठलेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दिवाळीत या वृध्द , निराधार, नागरिक महिलांना मानधन न मिळाल्यास  जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago