‘हम’ संघटनेने स्नेहालयातील बालकांसोबत साजरा केला ‘प्रेमा’चा दिवस

MH13NEWS Network

स्नेहालयातील बालकांसोबत साजरा केला प्रेमाचा दिवस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज संपूर्ण जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. पण प्रेम म्हणजे केवळ तरुण-तरुणींचे प्रेम नसून लहानग्या जीवांवर ममता दाखवणे म्हणजे खराखुरा प्रेमाचा दिवस साजरा करणे असं मानून सोलापुरातील हम संघटनेने स्नेहालयातील बालकांच्या समवेत आजचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

यावेळी लहान मुलांना गुलाब पुष्प देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण एका परिवारातले असा ठाम विश्वास देऊन या वंचित घटकातील बालकांसाठी हम संघटना सदैव पालकांच्या भूमिकेत असेल असा विश्वास यावेळी नुतन शहराध्यक्ष संजय हरिजन यांनी दिला यावेळी उपस्थित बालकांना अन्नधान्य, बिस्कीट पुडे व इतर गरजेच्या वस्तू देण्यात आल्या.

हे कार्यक्रम पार पाडण्याकरीत वैभव पाटोळे, रुपेश अंधारे,अमोल डांगे, नितीश वाघमारे, अकबर मुजावर, बशीर पटेल, सुदीप तुळसे, संतोष उबाळे ,अजय उबाळे, रोहित पांढरे,दत्ता नाटेकर, अनिकेत सरवदे, अप्पाजी गायकवाड, शरणू बनसोडे, सोहेल नदाफ, अरबाज शेख, श्रीमंत वाघमारे, संस्थापक महेश हणमे, नुतन शहराध्यक्ष संजय हरिजन आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

13 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

15 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago