अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर असे नियम धाब्यावर बसवून गाड्या दिवसभर रस्त्यावर उभे करतात. एकीकडे मार्केट यार्ड परिसर मृत्यूचा सापळा बनत चाललेला दिसताना दुसरीकडे वाहतूक पोलीस व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्यावर कोणतेच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. जवळच असलेल्या सरस्वती बाबुराव चाकोते प्रशालेतील विद्यार्थी रस्ता ओलांडताना दिवसभर या गाड्या रस्त्यावर असल्याने पलिकडून येणाऱ्या वाहतुकीचा अंदाज कळत नसल्याने नागरिक व शाळकरी विद्यार्थीना जीव मुठीत ठेऊन जावे लागत आहे. दिवसभर या सर्व मोठ्या शहरात बंदी असताना कोणत्या वाहतूक पोलिसांनी गाड्या शहरात सोडून अशी बेशिस्त पार्किंग सुरू केली याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

शहरात भरदिवसा या मोठ्या गाड्यांवर कारवाई न करता वाहतूक पोलीस चिरीमिरी घेत असल्याचे दिसत आहे. सर्व्हिस रोडवर शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी केली असले तरी मोठ्या गाड्यांचे पार्किंग व्यवस्था सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.

स्थानिक रहिवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्यावरील मोकाट पार्किंग केलेल्या गाड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव वेगाने गाड्या येऊन अचानक ब्रेक मारतात व नागरिकांना अरेरावी करत असतात. स्थानिक वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कामात व्यस्थ असताना हे गाड्या पार्क करून निघून जातात. या परिसरात अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही हालचाली होत नाही. यापुढे दुर्घटना घडल्यास मोर्चा काढणार
विजय कोळी
सामाजिक कार्यकर्ता

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे…

10 hours ago

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

11 hours ago

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील…

2 days ago

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे…

2 days ago

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट!

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी…

2 days ago

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील…

2 days ago