महाराष्ट्रात लवकरच होणार दारूची होम डिलिव्हरी!

1
12

(वेब टीम)

ड्रंक अँड ड्राईव्हमुळे तळीरामांकडून घडणाऱ्या अनेक दुर्घटना रोखण्यासाठी सरकारच्या डोक्यातून सुपीक कल्पना निघाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं ऑनलाईन दारू विकण्याची परवानगी देण्याचा विचार केल्याचं या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

ई-कॉमर्स, ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून दारूचे विविध ब्रँड तळीरामांना घरपोच मिळू शकणार आहेत. त्यामुळे दारूमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्वास मंत्री महोदयांना आहे.

खरं तर तळीरामांसाठी राज्य सरकार आता खुशखबर घेऊन येतं अशी टीका उमटताना दिसत आहे. आता दारू खरेदीसाठी वाईन शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. दारू घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ऑनलाईन दारू विक्री करण्याचा निर्णयच आता सरकारने घेतला आहे.

दारू पिऊन होणाऱ्या रस्ते अपघातात रोज ८ जणांचा मृत्यू होत असल्याने हा निर्णय घेत असल्याच बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे या ऑनलाईन दारू विक्रीमुळे खरंच अपघात कमी होणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ऑनलाईन दारू खरेदी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जाणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले आहेत. म्हणजेच ऑनलाईन दारू खरेदी करण्यासाठी वयाची मर्यादा असणार आहे. तर तुम्हाला दारू खरेदी करताना तुमचा आधार नंबर द्यावा लागणार आहे. ज्याने तुमची माहिती पडताळली जाईल.

त्याचबरोबर दारूच्या बाटल्या ऑनलाईन विक्रीसाठी आणण्याआधी बाटल्यांच्या झाकणावर लेबलिंग केलं जाईल. त्याने ती बाटली कुठे आहे हे ट्रक करता येईल. यामुळे स्मगलिंगसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here