बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी महाराष्ट्राची ‘योजना

0
84

  सोलापूर, दि. 18 : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे. देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपुर्ण संकल्पावर आधारीत उद्योगांना प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपुर्ण स्टार्ट अप  धोरण 2018 घोषीत करण्यात आलेआहे. धोरणाच्या अनुषंगाने महिला बचत गटाच्या  नाविन्यपुर्णउद्योग संकल्पनाना प्रोत्साहीत करुन स्टार्ट अप  संस्कृतीचा विकास करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजना ‘ राबविण्यात येत आहे.

            या योजने अंतर्गत महिला बचत गटांना तालुका व जिल्हास्तरावर मंच  उपलब्ध करुन देऊन  उत्कृष्ट नाविन्यपुर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध  करुन देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियान NRLM), राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (NULM), महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान (MSRLM). तसेच राज्य व केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत किमान एक वर्षापुर्वी तयार करण्यात आलेले.  पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट योजनेत सहभागासाठी पात्र ठरतील तालुकास्तरावर निवड केलल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास  जिल्हा नाविन्यता परिषदेमार्फत अर्थसहाय्य करण्यात येईल.

तालुका स्तरावर निवड झालेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्हास्तरीय मंचावर सादरीकरण पात्र ठरतील व त्यांना जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी देण्यात येईल. जिल्हा  स्तरावर निवड झालेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास  200000/- च्या मर्यादित जिल्हा नाविन्यता परिषदेमार्फत अर्थसहाय्य करण्यात येईल.

तरी या योजने अंतर्गत जिल्हयातील महिला  बचत गटांनी सहभागी होऊन  आपल्या नाविन्यपुर्ण संकल्पनांना चालना द्यावी. अधिक माहितीसाठी पंचायत समितीस्तरावरील एनआरएलएम (NRLM), तालुका अभियान कक्ष, जिल्हारतरावर (एमएसआरएलएम (MSRLM) अभियान कक्ष, जिल्हा परिषद, सोलापुर अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक सचिन जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here