महामार्गाच्या कामासाठी तलावातील मुरुम वापरणार

0
1

By-एम एच१३न्यूज वेब/टीम

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुस असणा-या तलाव, नाले, पाझर तलाव, जलसंधारण तलाव, नाले यांच्यातील माती मुरुम काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरला जावा. यासाठीची रॉयल्टी माफ केली जावी, असा निर्णय आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिैक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर – विजापूर, सोलापूर-मंगळवेढा-सांगोला- मिरज- कोल्हापूर, सोलापूर- हैद्राबाद आणि सोलापूर – अक्कलकोट आदी महामार्गांचे काम सुरु आहे. या कामांसाठी माती, मुरुम यांची कमतरता भासत असल्याने हे काम करणा-या कंत्राटदार कंपन्यांनी सांगितले होते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली.

वरील महामार्गाच्या आसपास असणा-या गावातील शेतक-यांनी शेततळे काढण्यासाठी तयारी दर्शविल्यास शेततळे काढुन देऊन त्यातील मुरुम या कामासाठी वापरला जाईल, अशा शेतक-यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, किशोर पाटील, दीपक शिंदे, प्रवीण साळूंखे, जलसंपदा विभागाचे बाबुराव बिराजदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here