Categories: राजकीय

इथं…शिवसेनेत आदेश चालतो आणि उमेदवार एकच ‘धनुष्य बाण’ ; प्रा. शिवाजी सावंत

महेश हणमे, MH13News

”विधानसभा निवडणुकीचे तिकीट कोणाला मिळेल हे ठरले नाही, जे ठरवणारे ते केवळ पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे..! शिवसेना एक मोठे कुटुंब आहे आणि कुटुंबातील नेते व कर्ते केवळ उद्धव ठाकरे असून त्यांचा आदेश शिवसेनेत चालतो, अन् उमेदवार एकच धनुष्यबाण ,हे समजूनच जुन्या व नव्या शिवसैनिकांनी आणि इच्छुकांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे” असा रोखठोक सल्ला शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी ‘निर्धार शिवशाही’चा या शिवसेनेच्या मेळाव्यात दिला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत नव्याने सेनेत डेरेदाखल झालेली दिग्गज नेते मंडळी हजर होती.

व्यासपीठावर सेनेचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, महिला जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड, महिला जिल्हाप्रमुख उज्ज्वला येलुरे, महिला शहरप्रमुख शांता जाधव, जिल्हा युवा अधिकारी मनीष काळजे, विठ्ठल वानकर, जिल्हा उपप्रमुख सुनील शेळके, प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, उमेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील आदी उपस्थित होते. तर
आमदार दिलीप सोपल आमदार नारायण पाटील, माजी आमदार दिलीप माने, रश्मी बागल, माजी आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार रतिकांत पाटील, साईनाथ अभंगराव, पुरुषोत्तम बरडे, नागनाथ क्षीरसागर,प्रकाश वानकर, दिपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. त्याच सोबत हुतात्मा स्मृती मंदिर च्या बाहेरील बाजूस असलेल्या लॉनमध्ये स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. त्यावर मेळावा दाखवण्यात आला. तो परिसरही कार्यकर्त्यांनी गच्च भरला होता.

कोण काय म्हणाले..
समन्वयासाठी घेतला निर्धार मेळावा
जुन्या शिवसैनिकांचे मार्गदर्शन व सहकार्य नव्या इच्छुकांना मिळण्यासाठी आणि येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हा निर्धार शिवशाहीचा मेळावा घेण्यात आला
लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील,सहसंपर्क प्रमुख

दक्षिण विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी प्रयत्नशील
सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र घेऊन आपल्याला जिल्ह्यातून चार आमदारांना विधानसभेत पाठवायचे आहे. यासाठी आम्ही कार्यकर्ते कामात कमी पडणार नाही. विरोधी पक्षालाच काय तर मित्रपक्षाला ही महाराष्ट्राची रणनीती ठरवण्यासाठी सोलापुरात यावं लागतं लागतं यातच शिवसेनेची ताकद दिसून येते. भविष्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत,विकास सोसायटी,पंचायत समितीवर भगवा फडकेल.
गणेश वानकर,जिल्हाप्रमुख

यावेळी आमदार दिलीप सोपल यांचं खुमासदार भाषण झालं. त्याच सोबत माजी आमदार दिलीप माने यांनीही आपले विचार व्यक्त केले. इतर मान्यवरांनीही समयोचित भाषणे केली.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

Breaking -ट्रॅव्हलर, सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

धक्कादायक मोहोळ विजापूर हायवे वरील घटना मोहोळ विजयपूर महामार्गावर येथे विजयपूर कडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग…

1 day ago

राज्यासाठी ठाकरे सरकारची पंतप्रधान मोदींकडे ही ‘मागणी’

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा…

2 days ago

माजखोर ‘वारिस’ तुझे 15 कोटी लोक घेऊन….

MH13NEWS Network एमआयएमचे वारिस पठाणच्या प्रतिमेला 'प्रहार'ने काळ फासलं आम्ही १५ कोटी मुस्लिम १३५ कोटी हिंदूवर भारी असल्याचे वादग्रस्त विधान…

2 days ago

‘यल्लोरु अप्पा बेडर शिवभक्त कन्नप्पा’…जयंती भक्तिभावात…

MH13NEWS Network महाशिवरात्री म्हणजेच सृष्टी दिन याच दिनी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे अख्यायिका मध्ये…

2 days ago

#शिवमय : महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर ‘भक्तीसंगम’

शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर फुलले सोलापूर, दि.21 फेब्रुवारी - महाशिवरात्रीनिमित्त कुडल संगम (दक्षिण सोलापूर) येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.…

2 days ago

या पुढे…राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज.!

मुंबई, दि. १७ राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा…

2 days ago