सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना देऊ मदतीचा हात.!

0
102

By-MH13News,network

सोलापूर : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व सीमा भागातील अनेक कुटुंब लाखोंच्या संख्येने निर्वासित झाले आहेत. या आपत्तीमध्ये त्यांच्या घरातील संसार व जीवनोपयोगी वस्तू, गुरे (जनावरे), मुलांचे शालेय साहित्य असे सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहे. तरी सर्व पूरग्रस्त बांधवांना हातभार लावणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन जाई जुई विचार मंचच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

आपण सर्वांनी पूरग्रस्त बांधवांचे कुटुंब पुन्हा उभारण्यासाठी काही जीवनोपयोगी वस्तू जसे की, धान्य – गहू, ज्वारी, साखर, रवा, तांदूळ, तेल, मुग डाळ, तुर डाळ, मीठ, साबण, पेस्ट, टॉवेल, जुने पण न फाटलेले कपडे, लहान मुलांचे नवीन उबदार कपडे, सतरंजी, चादर, ब्लँकेट, बेडशीट, भांडी, चटई, इत्यादी जीवनावश्यक साहित्य समस्त सोलापूरातील नागरिकांच्यावतीने एकत्रित जमा करुन पूरग्रस्त भागामध्ये त्वरीत पाठवण्याचा आमचा संकल्प आहे.

सोलापूर शहरातील दानशूर व्यक्तींनी, समाजसेवी संस्थांनी, मंडळांनी आपल्याकडे जमा केलेली मदत व वरील सर्व साहित्य स्वीकारण्यासाठी उद्या रविवार, दि. 11 ऑगस्ट 2019 आणि सोमवार, दि. 12 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 09 ते संध्याकाळी 08 पर्यंत पत्रकार संघ ऑफिस समोर, चार हुतात्मा पुतळ्याच्या शेजारी, पार्क स्टेडीयम याठिकाणी ट्रक (मदतीचा ट्रक) उभा केला असून वरील ठिकाणी आपण साहित्य देऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी वरील सर्व संग्रहित साहित्य सांगली, कोल्हापूर व इतर ठिकाणांच्या पूरग्रस्तांना त्वरीत पाठवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूरग्रस्तांना मदत देण्याच्या संदर्भातील सहकार्य व अधिक माहितीकरीता 9422460777, 9423068500, 9730160219, 9822050303 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आ.प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here