कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यास सहकार्य करा ; नगरसेवकांना आवाहन

MH13NEWS Network

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गाची  साखळी तोडण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आज करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आज सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली. यावेळी पेालीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, नगरप्रशासन अधिकारी पंकज जावळे उपस्थित होते.

बैठकीस प्रारंभी आयुक्त दीपक तावरे यांनी महापालिकेतर्फे कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी केले जात असणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला हवी, असे सांगितले. यासाठी पदाधिकारी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांना मदत करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिक उशीरा उपचारासाठी येतात. उपचारासाठी लवकर यावे, आजार लपवले जाऊ नये यासाठी नगरसेवकांनी प्रभागात नागरिकांच समुपदेशन करावे, आपल्या प्रभागातील खासगी डॉक्टरांना प्रतिबंधित क्षेत्र वगळून दवाखाने सुरु करण्याचे आवाहन करावे, असे सांगितले.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला ,पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी सभागृह नेते श्रीनीवास करली, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, शिवानंद पाटील, संतोष भोसले, भारतसिंग बडुरवाले, नरसिंग कोळी, नगरसेविका शहिदाबानो शेख, श्रीनिवास पुरुड, श्री. पातळे, श्री. आंबेवाले, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, नगरसचिव रुऊफ बागवान, सिध्देश्वर बोरगे, मनपा अधिकारी उपस्थित होते.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

18 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

19 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

20 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

20 hours ago

धक्कादायक | ग्रामीण भागात 107 पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

MH 13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या…

21 hours ago