दशभुजा गणपतीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दक्षिणा पेटी ऐवजी मदत पेटी..!

देविदास भैय्या बनसोडे यांची संकल्पना

0
38

By-MH13News,network 

सोलापूर तरटी नाका पोलीस चौकीसमोरील दशभुजा गणपतीच्या वतीने साधेपणातील गणेशोत्सवाची परंपरा यंदाही वर्षी कायम राखत अकरा दिवस गणेश उत्सव साजरा करताना ना वर्गणी, ना डीजे, ना भव्यदिव्य सजावट, ना फटाके फोडणे. मंडळाचे पदाधिकारी, सभासद आपल्या स्वखर्चाने शांतता राखत उत्सव साजरा करत असताना यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाकडून दक्षिणापेटी ऐवजी मदतपेटी ठेवण्यात आली आहे. उत्सवानंतर मंडळाकडे राहिलेली रक्कम व मदत पेठेतील रक्कम, समाजातील दानशूर व्यक्ती व परिसरातील व्यापारी वर्ग त्यांच्याकडून सर्व मिळालेली रक्कम एकत्रित करून पूरग्रस्त भागातील एका गावासाठी ही मदत देण्यात येणार आहे.


सांगली, कोल्हापूर या भागात पुरामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. “चला पूरग्रस्तांना मदत करूया व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले” या उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास बनसोडे यांनी सांगितले.
सुरेश भगत, रवी मस्के, भारत सुरवसे, समर्थ वटकर, गणेश माने यांनी सोलापुरातील सर्व नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पुढे यावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
यावेळी उत्सव अध्यक्ष ओंकार बोंडगे, उपाध्यक्ष कुमार भोगडे, रोशन पांढरे, विश्वनाथ भावे, नाना शिंदे, मनोज मुद्दे, गणेश विटकर, आबा मुद्दे ,मनोज कारंडे, शिवम पाटील, सुजल पांढरे, मंगेश बोडके, एकनाथ भांडेकर प्रथमेश माने, रोहन पांढरे मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here