उद्यापासून हेल्मेट सक्तीचे :जिल्हाधिकारी

By-एमएच१३न्यूज वेब/टीम

सोलापूर शहर, जिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट वापरण्याबाबत शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि परिवहन विभागातर्फे संयुक्त मोहिम राबवली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी, वाहतुक साक्षरता वाढीस लागावी यासाठी संयुक्त मोहिम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची  बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.  बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अतिरीक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता राजेश शेलार, कार्यकारी अभियंता विलास मोरे, अकलूजच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक परिवहन अधिकारी सतीश जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मिलींद वाबळे आदी उपस्थित होते.

बैठकीत श्रीमती गायकवाड यांनी जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 2017 मध्ये 1174 अपघात झाले. त्यामध्ये सुमारे 572 लोकांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये आतापर्यंत 992 अपघात झाले असून 435 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाहतुकीबाबत साक्षरता निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

यावर जिल्हाधिकारी डॉ .भोसले यांनी शहर, जिल्ह्यात उद्या पासून हेल्मेट वापरण्याबाबत शहर पोलिस, ग्रामीण पोलीस आणि परिवहन विभागाने मोहिम घ्यावी, असे सांगितले सीटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करा अशा सूचना  दिल्या.

हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणाऱ्या चालकांस मोटार वाहन अधिनियमातील 177 प्रमाणे 500 रुपयांचा दंड केला जाऊ शकतो.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago