कोरोना योद्धा पोरका ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

कोरोना लढ्यात महत्त्वपूर्ण बाजू सांभाळणारे कोरोना योद्धा  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे काल (1 ऑगस्ट) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते.

शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


ती अजातशत्रु होती : राजेश टोपे

“ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” अशी भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. कोरोना योद्धा पोरका झाला, अशा शब्दात अनेकांनी राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली वाहिली.

राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

आईला भेटूनच करायचे दिवसाची सुरुवात
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

मोठा दिलासा | कोरोनाची लस मिळणार केवळ 225 रुपयात !

संपूर्ण जगाला वेढणाऱ्या कोरोना महामारी विरुद्ध सर्व पातळ्यांवर लढाया सुरू आहेत .कोरोनाची लस कधी उपलब्ध…

6 mins ago

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago