Categories: राजकीय

सुभाष देशमुखांच्या प्रचारार्थ हत्तुरे वस्ती येथे जाहीर सभा

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग २५, हत्तुरे वस्ती येथे सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली.
राहुल सोलापूरकर यांनी सोलापूरकरांना उज्वल भविष्यासाठी लोकाभिमुख काम करण्याऱ्या सुभाष देशमुखांच्या पाठीशी उभे राहा, लोकांच्या गरजा ओळखून काम करणारे बापूंचे काम प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांनी उभारलेल्या संस्थेतून हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे. उजनी पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांनी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम आपण करूया असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप युवा नेते मनीष देशमुख यांनी मतदार संघातील विकास कार्याची माहिती देत विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या बापूंच्या पाठीशी उभे राहून बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन जनसमुदायाला केले.
सभेला नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेवक सुभाष शेजवाल, वैभव हत्तुरे, रासप प्रदेश उपाध्यक्ष विजय हत्तुरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, महेश आठवले, सुरज जाधव, प्रमोद हुच्चे, महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे, सुरेश औरंगे, सद्दाम मोमीन, विशाल बनसोडे, विशाल शिंपी, सागर अतनुरे, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे…

9 hours ago

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

10 hours ago

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील…

1 day ago

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे…

2 days ago

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट!

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी…

2 days ago

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील…

2 days ago