पुनश्च हरी ओम… आता मिशन बिगेन अगेन सुरु : मुख्यमंत्री ठाकरे

MH13 NEWS Network

मुंबई – केंद्र सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्यानेही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असून ५ जूनपासून मार्केट कॉम्प्लेक्स, सर्व बाजारपेठ आणि दुकानांना सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.त्यावेळी, लोकमान्य टिळकांचा दाखला देत पुनश्च हरी ओम.. म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करत असून आता, प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असल्याचे ठाकरे यांनी म्हटलंय.

राज्य सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरु झालं आहे. एकीकडे लॉकडाऊन केलं असताना दुसरीकडे पूर्वपदावर येण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कालावधीत संपूर्ण राज्यात काही स्थळं व व्यवसायास बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनश्च हरी ओम… केल्यानंतरही काळजी घेणं अनिवार्य असून तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. सध्या, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, केंद्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राच्या काही नियमांना अनुसरुन तर काही राज्य सरकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे, राज्यात धार्मिक आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. त्यासोबतच, हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी साधला संवाद त्यातील ठळक मुद्दे

या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला.

‘महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करत आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सज्ज आहोत

येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, आपली यंत्रणा सज्ज, पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

*➖मास्क लावणे अनिवार्य, कुठेही हात लावल्यानंतर चेहऱ्याला न लावणे, हे पुढील आयुष्यात लक्षात ठेवा.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही, आपण एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖ज्या ठिकाणी गर्दी होईल त्याला परवानगी नाही. एकमेकांपासून अंतर ठेवू तेवढंच कोरोनापासून अंतर राहिल, नातेवाईक भेटले तरी नमस्कार करा.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖बाहेर फिरताना जितके अंतर ठेऊ, तितकेच कोरोनापासून अंतर ठेवा, मित्र-आप्तेष्ट यांना भेटा, पण अंतर राखून नमस्कार करा, तीन तारखेपासून घराबाहेर व्यायाम करण्यास मुभा.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖पाच जूनपासून दुकाने एकआड एक दिवस सुरु करणार, तर आठ तारखेपासून कार्यालये सुरु करणार, कर्मचारीसंख्या 10 टक्के उपस्थितीने सुरु करणार.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖५५ ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर असे आजार असलेल्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖ज्यांना आवश्यक नाही खासकरुन जे वयोवृद्ध आहेत. त्यांनी बाहेर पडू नका. वयोवृद्धांनी बाहेर पडू नका.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖युवा वर्गाने आपल्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, स्वच्छ अंघोळ करुन काही अंतर राखावे.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖जे कोणी घराबाहेर पडणार आहेत, त्यांनी घरात येताना काळजी घ्या, त्याचा संसर्ग होईल असे होऊ नये. घराबाहेरुन आल्यानंतर हातपाय धुवा, अंघोळ करा.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं आहे.–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖एकूण ६५ हजार रुग्ण, २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे, ३४ हजार रुग्ण अॅक्टिव्ह, २४ हजार रुग्णांना लक्षणेही नाहीत, साडेनऊ हजार मध्यम ते तीव्र लक्षणे, दोनशे रुग्ण व्हेंटीलेटरवर. –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*👉महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करत आहे. –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

*➖जिथे शाळा सुरु करणे शक्य नाही, तिथे ऑनलाईन शाळा सुरू केली जाईल – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖जिथे शाळा सुरु करणे शक्य असेल तिथे शाळा सुरू होईल – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, असं सर्वाचंच मत – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖शाळा कॉलेज कसे सुरु करायचे याचा विचार सुरू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖सुमारे 16 लाख मजुरांना परराज्यांमध्ये सोडलं  – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖एसटीद्वारे सव्वापाच लाख मजुरांना सीमेवर सोडले – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖पियुष गोयल यांनी ट्रेन दिल्याने मदत – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖पियुष गोयल यांना मुद्दाम धन्यवाद देतो – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖संसर्ग रोखणं, तीव्रता रोखणं, मृत्युदर घटवणं हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖महाराष्ट्रात ऑक्सीजन बेट्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖वृत्तपत्र वितरक मुलांची पूर्ण काळजी घेणे अनिवार्य  – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖महाराष्ट्रात सध्या 77 चाचणी केंद्र आहेतं – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖7 तारखेपासून वृत्तपत्र घरपोच मिळणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖व्हेंटिलेटरवर  असलेल्या रुग्णांची संख्या फक्त 200 – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖3 तारखेपासून आऊटडोर व्यायामाला परवानगी – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖ज्येष्ठ नागरिक आणि विकार असलेल्यांनी घरात राहावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖गर्दी होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖पुढचे काही दिवस नियम काटेकोरपणे पाळा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

*➖मच्छिमार बांधवांनी चार दिवस समुद्रात जाऊ नये*

*➖आज मी आपल्यासमोर आलोय ते लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या टोकरीत फेकायला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago