Categories: सामाजिक

श्री सिध्दरामेश्‍वर यात्रा : कुंभार कन्येच्या माहेरांकडून 56 घागरी सुपूर्द ; कुंभार वाड्यात दीपपूजन

MH13 NEWS NETWORK :

सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभार कन्येच्या माहेरांकडून 56 मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी कुंभार समाजातील महिलांसह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 12 व्या शतकात कुंभार वाड्यातील कुंभार कन्येचा कसब्यातील सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता. आजही परंपरेनुसार संमत्ती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो.


प्रारंभी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कुंभार वाडा येथे प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांनी वाड्यातील गणपती व सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर वाड्यात दीप बसवण्यात आले. त्यानंतर हलगीच्या कडकडाटात व सनईच्या मंजूळ स्वरात 56 मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभार वाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आले. योगीराज शिवलिंग म्हेत्रे यांच्याकडून मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे मातीच्या घागरी सुपुर्द करण्यात आले.
त्यानंतर सिध्दामेश्‍वर महाराज पूजास्थान येथील शिवलिंगाचे पूजन करून नवैद्य दाखविण्यात आले. त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी उपस्थित वधू पक्षातील कुंभार समाजाला सिध्दरामेश्‍वरांनी सुरू केलेली अक्षता सोहळ्याच्या प्रथेची माहिती सांगून ती आजतागायत परंपरेनुसार सुरू असून ती पुढेही संस्काररुपाने पुढे नेण्याचे आवाहन केले.
यावेळी भिमाशंकर म्हेत्रे, योगीराज म्हेत्रे, रेवणसिध्द म्हेत्रे – कुंभार, संगण्णा म्हेत्रे – कुंभार, नागनाथ म्हेत्रे – कुंभार, सुरेश म्हेत्रे- कुंभार, महादेव कुंभार यांच्यासह समाजील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या.

कुंभार समाजाला यात्रेतील मान –
तैलाभिषेकास मानकरी शिवशेट्टी यांना घागर सुपूर्दीचा मान
कुंभार कन्येमुळे वधू पक्षाचा मान
अक्षतेच्यादिवशी पहिल्या नंदीध्वजास बाशिंग बांधण्याचा मान
होम कट्ट्यावरील शिवलिंगांची पूजा करण्याचा मान
संमती कट्याजवळ सगुडी देण्याचा मान
योगीराज म्हेत्रे यांना सम्मती कट्ट्याजवळ विडा घेण्याचा मान
कुंभार कन्येच्या प्रतिकात्मक रुपासाठी 5 बाजरीचे पेंड्या देण्याचा मान

होम विधीनंतर विडा घेण्याचा मान कुंभार वाड्यातील कुंभार कन्येचा सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योगंदडाशी विवाह झाला होता. गेल्या 12 शतकापासून रुढी व प्रथा परंपरेनुसार सुरू आहे. ती परंपरा आजही सुरू आहे. दरवर्षी सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला कुंभार समाजाकडून मातीच्या घागरी, बाजरीच्या पेंढ्या देण्याचा मान आहे.
योगीराज म्हेत्रे – कुंभार, मानकरी

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago