सांगा कसं जगायचं.? कसं चालायचं ? पडत की चिखलात घसरत ? शिवसेनेच्या धुत्तरगांवकर यांनी मांडली व्यथा

सभागृहात बॕनर फडकवत गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी मांडली लक्षवेधी

0
1058

By- महेश हणमे, MH13NEWS,network 

प्रभाग क्र १९ सह हद्दवाढ भागातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली असून रस्त्यावरून धड चालताही येत नाही. या रस्त्यावरून चालणं म्हणजे जणू सर्कसमध्ये भाग घेतल्यासारखे आहे अशा भावना व्यक्त करत शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत या विषयी लक्षवेधी मांडली.

गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी त्यांच्या प्रभागातील विविध रस्त्यांची छायाचित्रे असलेले डिजीटल बॕनर बनवून त्यावर सांगा कसं चालायचं ? पडत पडत की चिखलात घसरत ? सांगा कसं जगायचं ? असं शीर्षक दिलं होतं. धुत्तरगांवकर यांनी महापौरांना विचारले की, ताई, तुम्ही आणि आम्ही एकाच शहरात राहत असताना तुम्ही उत्तर ध्रुवावर आणि आम्ही दक्षिण ध्रुवावर राहत असल्यासारखा दुजाभाव का ?” महापौरांनी गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या प्रभागात तत्काळ मुरुम उपलब्ध करुन देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here