खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा शिंदे वय वर्षे 43 राहणार लक्ष्मी पेठ सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. एच.पाठवदकर यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती अॅडवोकेट मिलिंद थोबडे यांनी दिली.

यात हकीकत अशी की, सुमारे एक वर्षापूर्वी मयत अनिल चांगभले याने मध्यस्थी होऊन त्याचा मित्र दत्तात्रय गायकवाड यास 35000/ रुपये दरमहा 5% व्याज दराने तानाजी भोसले यांच्याकडून घेऊन दिले होते. मयताचा मित्र दत्तात्रय गायकवाड हा मयत झाल्यानंतर तानाजी भोसले व किरण शिंदे हे अनिल चांगभले यास पैशासाठी शिवीगाळ व मारहाण करून त्रास देऊ लागले, त्या त्रासाला कंटाळून दिनांक 16/ 9 /2020 रोजी बालवीर सार्वजनिक वाचनालय येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

अशा आशयाची फिर्याद मयताची पत्नी मीना अनिल चांगभले हिने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात दिली होती.
सदर प्रकरणी आपणास अटक होऊ नये म्हणून किरण शिंदे यांनी एडवोकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तीवादात अर्जदार/आरोपी यांनी मयतास अथवा त्याच्या मित्रास व्याजाने पैसे दिले नसल्याने मयतास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार तर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट विनोद सूर्यवंशी एडवोकेट दत्ता गुंड यांनी तर सरकार तर्फे एडवोकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago