ग्रामसेवक युनियनचे राज्यव्यापी धरणे आंदोलनास सुरुवात

by-MH13News,network

आज दिनांक 9 ऑगस्ट 2019 क्रांती दिनाच्या मुहूर्तावर ग्रामसेवक संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन अक्कलकोट पंचायत समिती कार्यालय समोर धरणे आंदोलन करून सुरुवात करण्यात आली राज्यभरातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी यापूर्वी केलेले आंदोलन दरम्यान सरकारने केवळ आश्‍वासन देऊन बोळवण केल्याने दिनांक 9 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले येत आहे.

या आंदोलनांमध्ये दिनांक 13 ऑगस्टला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन, दिनांक 16 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दिनांक 18 ऑगस्टला पालकमंत्री यांना निवेदन देण्यात येईल, दिनांक 22 ऑगस्ट पासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येतील. दिनांक 24 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल तरी सर्व ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने सर्व प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी लक्ष्य वेध करण्यात येत आहे.

असहकार आंदोलन काळात कोणतेही आढावा सभेस ग्रामसेवक बसणार नाही तसेच सदर आंदोलन काळात कोणतेही अधिकाऱ्याला अभिलेखे दाखवणार नाहीत तसेच अहवाल सादर करणार नाही. सदर आंदोलन अक्कलकोट पंचायत समिती येथे ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष श्री. अशोक म्हेत्रे,उपाध्यक्ष श्री. शिवलिंगप्पा वंगे व सचिव श्री. प्रेमदास पवार यांचे नेतृत्वात सर्व ग्रामसेवक समवेत करण्यात आले अशी माहिती तालुका अध्यक्ष श्री अशोक म्हेत्रे,उपाध्यक्ष श्री. शिवलिंगप्पा वंगे व सचिव श्री. प्रेमदास पवार यांनी दिली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago