ग्रामपंचायत निवडणूक | ‘या’ तालुक्यातील 296 अर्ज बाद ; 21 हजार 32 अर्ज मंजूर;  सोमवारी ‘पिक्चर’ होणार स्पष्ट…

MH13News Network

सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींतील 6301 सदस्यपदांसाठी 20 हजार 952 उमेदवारांनी दाखल केलेल्या 21 हजार 328 अर्जांची गुरूवारी छाननी करण्यात आली. यात 270 उमेदवारांचे 296 अर्ज बाद करण्यात आले. छाननीअंती 20 हजार 682 उमेदवारांचे 21 हजार 32 अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र सोमवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

तीन अपत्ये, मागील निवडणुकीचा खर्च दिला नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी, अतिक्रमण, ठेकेदारी आदी कारणे अर्ज नामंजूर करण्यामागे दिलेली आहेत.

तालुकानिहाय नामंजूर व मंजूर अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे. कंसात नामंजूर अर्ज…

करमाळा (23) 1424, माढा (10) 2387, बार्शी (33) 2340, उत्तर सोलापूर (14) 738, मोहोळ (17) 2149, पंढरपूर (33) 3300, माळशिरस (40) 1851, सांगोला (13) 2587, मंगळवेढा (23) 887, दक्षिण सोलापूर (32) 1544, अक्कलकोट (58) 1825  एकूण (296) 21032.

येत्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. अजुनही काही ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

1 hour ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago