चित्रकला करियर घडविण्याचे चांगले माध्यम : तेजस्विनी सोनवणे

MH13NEWS network

वीरशैव व्हिजन महिला आघाडीतर्फे तेजस्विनीचा सत्कार

सोलापूर : चित्रकला ही एक सुंदर कला आहे. काही जणांना चित्रकलेची आवड असते. आवड आणि छद म्हणून चित्र काढत असताना
चित्रकला करियर घडविण्याचेही चांगले माध्यम आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे आणि पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तेजस्विनी सोनवणे यांनी केले.
उदयोनमुख प्रतिभावंत चित्रकार तेजस्विनी सोनवणे यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांच्या हस्ते तेजस्विनीचा फेटा, शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सोनवणे पुढे म्हणाल्या की राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद वाटला. माझ्या वाटचालीत आई-वडिलांसह मार्गदर्शकांचा सहभाग आहे. भविष्यातही चित्रकला क्षेत्रात चांगले काम करून आपल्या गावाचे, देशाचे नाव लौकीक करण्याचा प्रयत्न असणार आहे.
याप्रसंगी सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, स्विटी करजगीकर, अश्विनी बिराजदार, वैशाली बिराजदार, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

3 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

3 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

4 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

4 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

7 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

7 hours ago