गणेशोत्सव व मोहरम | कोरोनाचा फैलाव होणार नाही असे नियोजन !

लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमीका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणेशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक /सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

गृह (गामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी यावषीर् 60 ते 65 टक्के गणेशोत्सव मंडळळानी  सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago