केंद्रीय मंत्री गडकरींनी देशमुखांच्या निवासस्थानी केले ‘लोकयात्री’चे प्रकाशन

भोवळ आल्याने पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता रद्द

0
186

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आज भोवळ आली होती. त्यामुळे त्यांचे आजचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. “लोकयात्री” या पुस्तक प्रकाश सोहळ्यात गडकरी हुतात्मा स्मृती मंदिर येथे उपस्थित राहणार होते परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचे प्रकाशन सहकारमंत्री देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गडकरींना भोवळ आल्यानंतर त्यांनी कुलगुरूंच्या निवास स्थानी अर्धा तास विश्रांती घेतली होती. वर्धापन दिन कार्यक्रम संपल्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांच्या घरी सुद्धा त्यांनी तासभर विश्रांती घेतली. या विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी सर्वांसोबत जेवण केले. जेवणानंतर देशमुखांच्या निवासस्थानी लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सांगलीचे खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापौर शोभा बनशेट्टी, निरुपणकार विवेक घळसासी, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, रोहन देशमुख, इंद्रजित पवार, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रेणुका महागांवकर, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, राज्य बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागांवकर, कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह सहकारमंत्री देशमुख कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here