आजपासून सुरू होणार जी २० परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी

आजपासून दोन दिवसांची (२१ आणि २२ नोव्हेंबर २०२०) जी २० परिषद सुरू होत आहे. ही पंधरावी जी २० परिषद आहे. कोरोना संकट असल्यामुळे यंदा इतर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांप्रमाणे जी २० परिषदही ऑनलाइन आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व सदस्य परिषदेला उपस्थित राहतील. यंदाच्या जी २० परिषदेत प्रामुख्याने कोरोना महामारी, जगापुढील आरोग्यविषयक आव्हाने, कोरोनामुळे मंदावलेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे उपाय यावर चर्चा होणार आहे.

यजमान सौदीअरेबिया भारताला या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाचा मान राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होणार आहेत. याआधी १० नोव्हेंबर रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या राष्ट्र प्रमुखांची परिषद आणि १७ नोव्हेंबर रोजी ब्रिक्स झाली. या दोन्ही परिषदांचे यजमानपद रशियाकडे होते.

जेव्हा संबंधित देशाच्या दौऱ्याच्या निमित्ताने नेत्यांच्या भेटीगाठी होतात त्यावेळी औपचारिकता म्हणून निवडक देशांचे नेते एकमेकांशी चर्चा करतात. या औपचारिक चर्चा काही वेळा एखाद्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. पण यंदा आंतरराष्ट्रीय परिषदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहेत. भारत आणि चीन यांच्यात असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांच्या नेत्यांनी परिषदेच्या निमित्ताने औपचारिकता म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणे टाळले. जी २० परिषदेत या प्रकाराची पुनरावृत्ती होणार का, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भारत जी २० परिषदेत दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय लढाई, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक स्थैर्य, जागतिक व्यापार संघटनेतील सुधारणा, अन्न धान्य सुरक्षा, पर्यावरण संतुलन हे मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. याआधी जी २० सदस्यांशी संबंधित एक अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जी २० गटाचे सदस्य असलेले देश पर्यावरण संतुलनासाठी करत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले. जी २० गटाच्या सदस्यांपैकी भारत हा एकमेव देश पर्यावरण संतुलन राखण्यासाठी निश्चित केलेल्या लक्ष्यांना पूर्ण करू शकला.

सौदीचे भारतातील राजदूत सौद बिन मोहम्मद अल सती यांनी यंदाची जी २० परिषद भारताच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी कोरोना संकटात भारताकडून अनेक देशांना दिल्या जात असलेल्या मदतीचे जाहीर कौतुक केले. भारतामुळे जी २० गटाला नवा दृष्टीकोन लाभला, ज्ञानाची नवी कवाडे खुली झाली आणि नवे अनुभव मिळाले. जी २० गटाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत भारतामुळे महत्त्वाचे बदल झाले, असे सांगत सौदीच्या भारतातील राजदुताने भारताचे कौतुक केले.

जी २० गटात अमेरिका, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, अर्जेंटिना, ब्राझिल, मेक्सिको, फ्रांस, जर्मनी, इटली, इंग्लंड, चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. स्पेन या देशाला कायमस्वरुपी अतिथी म्हणून विशेष आमंत्रण दिले जाते. या व्यतिरिक्त निवडक देशांना प्रत्येक वेळच्या जी २० परिषदेसाठी आमंत्रित केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी आणि महत्त्वाची आर्थिक ताकद अशा दृष्टीकोनातून जी २० गटाकडे बघितले जाते. यंदा मार्च २०२० नंतर आता नोव्हेंबर २०२० मध्ये जी २० गटाची परिषद होत आहे. याआधी मार्च २०२० मध्ये झालेल्या जी २० गटाच्या परिषदेत कोरोना संकट हा चर्चेचा विषय होता. सौदी अरेबिया यंदाच्या जी २० परिषदेचे आयोजन करत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

5 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago