फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या फ्युचर शॉपी स्टोअर्स प्रा. लि.चे उदघाटन गुरुवारी (ता.२१) सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक महेश केसकर आणि संचालिका आरती बंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे उपस्थित राहणार आहेत.

ग्राहकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जवळपास सर्व वस्तू, हॉटेल, पदार्थ, औषधे आणि रुग्णालयातील उपचार यांवर ग्राहकांना सूट मिळणार आहे.

यासाठी फ्युचर शॉपी कंपनीने ग्राहकांसाठी अवघ्या ९५० रुपयांत माय कार्ड उपलब्ध करून दिले आहे. या एकाच कार्डच्या खरेदीवर ग्राहकांना व्यावसायिकांची माहिती असलेली पुस्तिका, वर्षभरातून तीन वेळा आरोग्य तपासणी तसेच डीटीपी, टॅली किंवा इंग्रजी संभाषण वर्ग यांपैकी एक अभ्यासक्रम मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर 199 रुपयांमध्ये दरमहा अनलिमिटेड कॉलिंग ,४० जीबी डेटा, १०० एसएमएसचे पोस्टपेड कार्ड प्रीपेडपेक्षाही कमी दरात आणि राष्ट्रीयकृत बँकेत दोन लाखांच्या अपघाती विम्यासह झिरो बॅलन्स बचत खाते देण्यात येणार आहे, असे संचालिका आरती बंडी म्हणाल्या.

या कार्डच्या माध्यमातून मल्टिपल डिस्काउंट बास्केट देण्यात येईल. याचा वापर करून वर्षभरात हॉटेल, हॉस्पिटल, ब्युटी पार्लर, केक शॉप, जीम, कापड दुकाने, टेलर, किराणा दुकान, टायपिंग, झेरॉक्स अशा ५० पेक्षा अधिक प्रकारच्या ४८० व्यावसायिकांकडून २५ टक्क्यांपर्यंत सूट ग्राहकांना मिळवता येणार आहे. तसेच काही व्यावसायिकांकडून या सवलती व्यतिरिक्त वर्षभरात ३० टक्क्यांपर्यंतच्या सूटचे एक ते सहा व्हाउचरही ग्राहकांना मिळणार आहेत, असे संचालक महेश केसकर यांनी सांगितले.

या सर्व सुविधांच्या व्यतिरिक्त फ्युचर शॉपी प्रा. लि. कडून नळकाम, सुतारकाम, टाकी स्वच्छता, घरगुती वस्तूंची दुरुस्ती अशा कामांसाठी लागणारे कामगार कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्राहकांना कमी दरात खरेदी किंवा अन्य कामे करण्यासाठी आणि व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी फ्युचर शॉपी प्रा. लि. माध्यम म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेस अंबादास शेतशिंदे, ज्योती मोरे, मयूर शेरखाने, श्रीकांत बन्नी आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

9 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

11 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

14 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

1 day ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago