गरिबांना नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा , वाचा सविस्तर

MH 13 News Network

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती, चीनची घुसखोरी, चीनी  App वर बंदी , आंतरराष्ट्रीय तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज  मंगळवारी देशवासियांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा देशवासियांना अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यानुसार, देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना डाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर हे आजही महत्त्वाचं असल्याचं मोदींनी आजच्या भाषणात म्हटलं.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago