मोहोळ तालुक्यातील विरवडे येथे 4 हरणांची शिकार ; एकास पोलीस कोठडी

MH13NEWS,NETWORK

मोहोळ तालुक्यातील विरवडे बु.येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास चार हरणाची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हरणाची शिकार करून त्याची कातडी वाळवत असताना वनविभाग व मोहोळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

विरवडे बु. येथील निर्जनस्थळी बबन भीमा पवार व एक अज्ञात व्यक्ती हरणाची शिकार करून त्याची कातडी वाळवत असल्याची माहिती पोलिसांना व वनविभागाला मिळाली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस या ठिकाणी गेले असता पोलिसांना पाहताच शिकाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून बबन पवार याला पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला़ या ठिकाणी पोलिसांनी व वनविभागाने केलेल्या कारवाईत हरणाचे मांस व कातडे हस्तगत केले आहे.

बानू भीमा पवार यांच्या वस्तीवर उपवन संरक्षण वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड घातली होती. तेथे हरणांचे कातडे सुकलेल्या अवस्थेत टाकलेले होते. तसेच हरणाचे मांस, शिंगे व अन्य साहित्य मिळाल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पवार याला अटक केली. त्याला मोहोळ कोर्टासमोर उभे केले असता 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश मोहोळच्या न्यायालयाने दिला.

जप्त केलेल्या मृत हरणाचे कातडे, मांस, शिंगे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणेचे विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago