गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही ; छत्रपती संभाजी राजे

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश मागे घ्यावा.

0
686

“महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर पर्यटन वाढीसाठी हॉटेल उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची बातमी वाचनात आली, सुदैवाने मी मुंबईतच होतो. तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करुन कोणत्याही गडावर हॉटेल काढण्यास परवानगी देऊ नये, असे झाल्यास शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जातील असे सांगितले.”

“मुख्यमंत्र्यांनी हा विषय तात्काळ स्थगित करण्याचे आदेश संबंधित मंत्रालयाला देण्यात येतील, असे मला सांगितले आहे. जुलै महिन्यामध्ये सुध्दा गडकिल्ल्यांवर हॉटेल उभारण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे हे गडकिल्ले आहेत. महाराजांचा चरणस्पर्श झालेला प्रत्येक किल्ला आम्हाला पवित्र आहे.गडांवर हॉटेल न करता जर त्यांचे जतन आणि संवर्धन केले तर देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील यातून स्थानिकांना रोजगार मिळतीलच पण त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल.”असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here