माढ्यात जबरी चोरी ;गळ्याला लावला चाकू तर श्वान पथक घुटमळले…

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी:
माढा येथील न्यायालयाच्या शेजारी आपल्या शेतात राहत असलेल्या अमरदीप भांगे यांच्या घरी धारदार शस्त्राचा धाक दाखवून पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जबरी चोरी करण्यात आली. यावेळी 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमालावर चोरट्यांनी दरोडा टाकला.

याबाबत अमरदीप भांगे यांची मुलगी अमृता जगताप यांनी माढा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची दखल घेत आज सकाळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक घरापासून काही अंतरावर जाऊन परत माढा न्यायालयाच्या परिसरात घुटमळत होते.
दरम्यान ,आज दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणाची पाहणी केली.
याबाबत फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की अमरदीप भांगे यांच्या राहत्या घरी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जिन्याच्या मार्गाने 4 चोर घरांमध्ये शिरले व हॉलमध्ये प्रवेश करून झोपलेल्या अमरदीप भांगे यांच्या पत्नी व मुलगी यांना चाकुचा धाक दाखवून कपाटातली 4 तोळ्याच्या पाटल्या,5 तोळ्याचे गंठण, 4 तोळ्याच्या बांगड्या, 5 तोळ्याचे लाॅकेट, 2 तोळ्याचे छोटे गंठण , कानातील तीन जोड ,1 ग्रॅमचा कळस, 2 ग्रॅम बदाम, 1 सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण 7 लाख 61 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला. सदर या घटनेचा पुढील तपास माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने करत आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

4 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

22 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago