‘ठाकरे सरकार’ करणार राज्य कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

By-MH13 News,network

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे पाच दिवसाचा आठवडा होणार असल्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतील असे स्पष्ट दिसत आहे.
शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना खूष करण्यासाठी तसे निर्णय घेण्याचे ठरविले असून, लवकरच राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सरकारी अधिकारी-कर्मचारी यांची बाजू घेतलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या मंत्रालयातील प्रवेशाच्या वेळी अधिकाऱ्यांनी व मंत्रालयातील कर्मचारी मंडळींनी दुतर्फा उभे राहून स्वागत केलं होतं.

सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करावी, आदी मागण्याचे निवेदन सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले जाणार आहे. त्यांपैकी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत निर्णय घेण्यास ठाकरे सरकार राजी झाले आहेत अशी माहिती राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे. .नया निर्णयासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे हा निर्णय तातडीने घेतला जाईल. तसेच, राज्याचा कारभार करताना प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनाही वाटते आहे.

शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांना या सरकारचे प्राधान्य असेल. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात त्याबाबत उल्लेख असल्याचेही सांगण्यात आले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago