बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480

सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एक देखणी वास्तू म्हणून ‘इंद्रभुवन’चा उल्लेख होतो. शहराच्या राजकारणातील अनेक चढ-उतार या इमारतीने अनुभवले आहेत. ‘नगर सेवा हीच ईश सेवा’ असे ब्रीद वाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या ‘हेरिटेज वास्तू’कडे मात्र ‘कारभार्‍यां’चे दुर्लक्ष झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे ‘फायर ऑडिट’ अजून झाले नाही.

2012 साली इंद्रभुवन तसेच या परिसरातील प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट झाले होते. त्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले, ही मोठी गंभीर बाब आहे.
सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत,कौन्सिल हॉल इत्यादीचे अग्निशामक दलाकडून 26 जून 2012 रोजी फायर ऑडिट झाले.आणि त्याचं कारण म्हणजे मुंबई येथील मंत्रालयास त्याच वर्षी भीषण आग लागून अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज जळून खाक झाले होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपायोजना अधिनियमांतर्गत महानगरपालिका परिक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक इमारतीचे दरवर्षी फायर ऑडिट करणे गरजेचे आहे.असे असताना शहराचे कारभारी मंडळींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

महापालिका आयुक्त म्हणाले होते की…

MH13 न्यूजने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना फायर ऑडिट विषयी बोलते केल्यानंतर त्यांनी एक महिन्यांमध्ये संपूर्ण महापालिकेचे ऑडिट पूर्ण केले जाईल असे सांगितले होते. परंतु त्यास तीन महिने उलटून गेले तरीही अजूनही ऑडिटच्या कामाला मुहूर्त लागत नाही. ही चिंतेची आणि तितकीच खेदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शहरात नुकत्याच झालेल्या दुर्घटना

शनिवारी 16 जानेवारी रोजी गुरुनानक चौकातील पाच दुकानांना आग लागली होती.या आगीत सुमारे तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर काल रविवारी दाजी पेठ परिसरातील बालाजी मंदिर शेजारी असलेल्या घराला आग लागली होती. यामध्ये वित्त हानी झाली होती.

महाराष्ट्र हळहळला…

आठ जानेवारीच्या मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री घडलेल्या जळीत कांडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यामध्ये दहा बालकांचा मृत्यू झाला होता. भंडारा दुर्घटनेमध्ये चिमुकल्यांचे भविष्य भस्मसात झाले होते.

वाचा भाग -2…पुढील बातमीत

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

9 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

11 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

14 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

2 days ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago