‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम एच 13 न्यूजने महापौर ,महापालिका आयुक्त ,अग्निशामक दलाचे अधीक्षक, विरोधी पक्षनेता,नगरसेवक यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया जशाच्या तशा…

संबंधित विभागास आदेश द्यावे

महापौर

भंडारा जिल्ह्यात 10 नवजात अर्भके मृत्युमुखी पडल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली.त्यावेळी भंडारा जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे निदर्शनाला आले होते. तरी सोलापूर महानगरपालिकेचे सर्व दवाखाने ,प्रसूतिगृहे आणि कार्यालये यांचे फायर ऑडिट करून घेण्याची कार्यवाही करावी असे पत्र महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे अधीक्षक यांना  दिले होते. त्यावर कार्यवाही सुरू आहे.मात्र इंद्रभुवन आणि प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे ते तात्काळ करावे.
श्रीकांचना यन्नम,महापौर

बजेट उपलब्ध आहे का नाही पाहतो…

महापालिका आयुक्त

महापालिकेच्या इमारतीचे आणि प्रशासकीय इमारतीचे फायर ऑडिट करण्यासाठी बजेट उपलब्ध आहे की नाही हे पाहून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.हे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर

हा ढिसाळपणा ; कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ नको

अमोल बापू शिंदे ,विरोधी पक्षनेते

सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात रोज हजारोच्या संख्येने कर्मचारी आणि नागरिक यांची ये-जा असते यांच्या जीवाशी खेळ नको .प्रशासनाचा हा ढिसाळपणा आहे. यासंदर्भात तातडीने महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करत आहे.
अमोल (बापू )शिंदे ,विरोधी पक्षनेता

दुजा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण…

शहरातील इमारती संदर्भात फायर ऑडिटचा बडगा उगारणारे आज नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. इतकेच नव्हे तर रोज या परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असताना हे इतके शांत कसे काय बसू शकतात. दुजा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा वृत्तीने प्रशासनाने कामकाज करु नये.

तातडीने इंद्रभुवन व प्रशासकीय इमारतींचे फायर ऑडिट करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

गुरुशांत धुत्तरगावकर,शिवसेना शहर प्रमुख

लवकरच सुरू होईल काम…

केदारनाथ आवटे

महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटल, बॉईज हॉस्पिटल, गोलचावडी दवाखाना, साबळे हॉस्पिटल, यांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे ,उर्वरित महापालिकेच्या दवाखान्यांची यासंदर्भात तपासणी  लवकरच सुरू करण्यात येईल .तसेच 204 खाजगी दवाखान्यांची तपासणी करण्यात आली आहे.लवकरच महापालिकेच्या इमारतीचे फायर ऑडिट होईल.याआधी 2012 साली या इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आले होते.

केदार आवटे ,अग्निशामक दल प्रमुख

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

10 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

12 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

15 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

2 days ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago