कोनापुरे चाळीतील घराला आग ; लग्नासाठी जमवलेल्या ‘नोटां’चा झाला ‘कोळसा’

MH13NEWS Network

सोलापुर शहर परिसरातील कोनापुरे चाळीतील एका घराला आग लागून खूप मोठे नुकसान झाले. घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती चंदू भंडारे यांनी दिली. मुलाच्या लग्नासाठी जमवलेल्या नोटांचा अक्षरशः कोळसा झाल्याने भंडारे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. दुर्घटना ही शॉर्टसर्किटमुळे झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चंदू भंडारे( वय वर्ष 55 )हे कोनापुरे चाळीत आपल्या कुटुंबासमवेत राहतात.आज मंगळवारी साधारण अकराच्या सुमारास अचानक आग लागली. त्यांचा मुलगा AC रिपेअरी चा व्यवसाय करतो. त्याने दुरुस्तीसाठी आणलेले एसी जळून खाक झाले. त्यात सोबत घरातील कूलर, टीव्ही व इतर संसारोपयोगी साहित्य जळून गेले आहे. मुलाच्या लग्नासाठी भिशीच्या माध्यमातून त्यांनी पैसे जमवले होते. सव्वा लाख रुपये त्यांनी कपाटात ठेवले होते त्या नोटांची ही राख झाल्याचं भंडारे यांनी सांगितले.
सदर दुर्घटना ही शॉर्टसर्किटमुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागातील सामाजिक कार्यकर्ते अंबादास करंगुळे आणि स्थानिक रहिवासी भंडारे यांच्या मदतीसाठी धावून गेले .पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु झाले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

11 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago