अखेर… ‘या’ तीन रेशन दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त

MH13 NEWS Network

सोलापूर दि. 20 :  लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन कार्ड धारकांना धान्याची पावती दिली नाही म्हणून शहरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्क्म जप्त करण्याची कार्यवाही अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांना विविध योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे सूचना दिल्या होत्या. तथापि  जिल्ह्यातील काही रास्तभाव दुकानदार नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत. तसेच रेशन कार्ड धारकांना पावती देत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शहरातील परिमंडळ अ विभागातील श्री जमात पंजाब तालीम, रास्त भाव दुकान क्रमांक अ-8 आणि सौ. शांताबाई बाबुराव म्हमाणे अ-1 आणि परिमंडळ क विभागातील मल्लिकार्जुन बनसोडे रास्तभाव दुकान क्रमांक 57 या तीन दुकानांच्या अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, असे श्री. पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

याचबरोबर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील गंगामाई महिला बचत गट आणि पी. एस. लोकरे यांच्या रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. बार्शी तालुक्यातील मौजे चिखडे येथील दुकान क्रमांक 61 निलंबित करण्यात आले आहेत. धान्य वाटपात अनियमितता, मूळ शिधापत्रिका आणि ऑनलाईन शिधापत्रिकेच्या नावात बदल अशा त्रुंटीमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ही कार्यवाही करण्यात आली,  असे श्री. पाटील यांनी सांगितले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago