लढा कोरोनाशी :नगरसेवक देवेंद्र कोठेंच्या स्वखर्चातून आरोग्य शिबिर ; जिल्हाधिकारी,आयुक्तांची तत्परतेने मदत

MH13 NEWS Network

सोलापुरातील प्रभाग क्रमांक सात मधील लोकांसाठी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी संपूर्ण प्रभागात शनिवार दिनांक २३ मे पासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. थर्मल स्कॅनर द्वारे टेंपरेचर तपासनी ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन व पल्स तपासणी करण्यात येत आहे प्रथम दिवस प्रभाग सात मधील खमीतकर अपार्टमेंट,चातक सोसायटी,चिंच नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये ४५०लोकांची तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री.मिलिंद शंभरकर , पालिका आयुक्त श्री.दिपक तावरे,महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या आरोग्य शिबिराला भेट दिली.

शिबिराचे नियोजन व हेतू पाहून जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी आम्ही या साठी कश्या पद्धतीने सहभाग नोंदवू शकतो म्हणून नगरसेवक देवेंद्र कोठे यांना विचारणा करून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच तातडीने जिल्हाधिकारी  व पालिका आयुक्तांनी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना या शिबिरासाठी दोन अतिरिक्त थर्मल स्कॅनर गन व ३००० मास्क व मल्टी विटामिनच्या गोळ्या स्लम एरिया मधील लोकांना वाटप करण्यासाठी तातडीने पाठवून दिले.
देवेंद्र कोठे यांनी पालिका आयुक्त दिपक तावरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आभार व्यक्त केले.

होम क्वारंटाईन…
झिरो पेशन्ट झालेले कंटेन्मेंटट झोन १४ दिवस झाल्यानंतर लगेच शिथिल करण्याबाबत नगरसेवक कोठे यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना विनंती केली होती. ज्या नागरिकांचे चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत व पेशंट व होम क्वारंटाईन मधील सर्व लोक निगेव्टिह आल्यानंतर त्या कंटेनमेंट झोनला शिथिल करण्यात यावी. जेणेकरून कंटेनमेंट झोन मधील इतर नागरीकांना जास्त त्रास होणार नाही अशी विनंती केल्यानंतर या संबंधीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ आणि इतर लोकांना बाहेर पडण्यासाठी मोकळीक देऊ असे आश्वासन दोघांनी दिले

या शिबिरात सोशल डिस्टन्स पालन करून नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली होती. डॉ. राजगोपाल तापडिया,  परिचारिका सौ. शिवगंगा शितलकुमार वाघमोडे ,अभिजित मुंगळे यांनी नागरिकांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बाबा शेख,अक्षय ऐवळे, संभाजी गुंड,विनोद पवार, दीपक शितोळे, क्रांती गोयल, कुणाल पवार, राहुल गोयल यांनी परिश्रम घेतले

या वेळेस किरण पवार, विठ्ठल आयवळे ,शहाजी राऊत,गुरुप्रसाद इनामदार,तबीब, राजन वर्मा ,कसबे,नंदी ,देशमुख काका,रानेश चव्हाण रंजना पवार,रूकमिनी आडेकर,ज्ञानेश्वर पवार, सुधाकर नकाते ,आनंद जगताप,विष्णू आयवळे, संजय कांबळे,अभिषेक आयवळे, अजय मस्के, शुभम गवळी, रोहित कांबळे सुरज होगडे ,सौदगर रणदिवे
राहुल कांबळे अनिकेत घाडगे ,अजय मस्के यांनी परिश्रम घेतले

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago