फेस्टीव्हलमुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा -अभिनेञी रेश्मा भटकर

सिनेतारकांच्या उपस्थितीत टेंभुर्णी फेस्टीव्हलचे उद्घाटन

टेंभुर्णी ( प्रतिनिधी)

बालपणी ग्रामीण भागात याञा हेच आकर्षण होते पण
“टेंभुर्णी फेस्टीव्हल” सारखा कार्यक्रम सलग सोळा वार्ष आयोजित करीत असलेने यामुळे लहान थोरांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येतात यातून मनोरंजन होत आहे यामुळे बालवयातील आठणींना उजाळा मिळूण मन प्रसन्न होत असलेचे मत सिने अभिनेञी रेश्मा भटकर यांनी मांडले.त्या येथील बहुजन प्रतिष्ठान ने आयोजित सालाबादप्रमाणे केलेल्या १६ व्या “टेंभुर्णी फेस्टीव्हल २०२० चे” या मनोरंजनपर सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिमाखदार संपन्न झाला.माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते आणि सिनेतारका मंजिरी अभिनेञी आश्लेषा तांदळे,वैशाली कदम व अभिनेता दिग्दर्शक रमेश चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत फेस्टीव्हलचे उद्घाटन झाले.यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तांबवे चे माजी सरपंच राजाभाऊ खटके, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती मस्तूद ,पुण्याचे युवा उद्योजक प्रशांत पठारे ,माजी उपसरपंच परमेश्वर देशमुख ,रोटरी क्लबचे अध्यक्ष मुकुंद आटकळे, वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील धोत्रे, वडार पँथरचे राजकुमार धोत्रे ,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे, दयानंद वजाळे,ग्रा.प.सदस्य गणेश केचे ,डॉ .सोमनाथ साळुंके, शैलेश ओहळ, बहुजन सांघर्ष समीतीचे माजी शिवसेना शहरप्रमुख किशोर नाळे,सोमनाथ कदम,नागनाथ वाघमारे ,सिद्धेश्वर मदने, बाळासाहेब बागाव ,माजी सरपंच मोहन वाघमारे, रामभाऊ वाघमारे , सर्व पत्रकार बांधव व संयोजक अध्यक्ष संतोष वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
सलग सोळा वर्ष हा उपक्रम यशस्वी राबविल्याबद्दल आमदार शिंदे यांनी संयोजन समितीचे कौतुक करून टेंभुर्णी शहरासाठी शासकीय जागेवर बहुउद्देशीय क्रीडा संकुल व मैदानासाठी भविष्यात प्रयत्न करू असे आश्वासन दिले, माजी सरपंच राजाभाऊ खटके, अभिनेते रमेश चौधरी ,अभिनेत्री मंजिरी यशवंत, रेशमा भटकर ,अश्लेशा तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून फेस्टिवलसाठी शुभेच्छा दिल्या .प्रास्ताविकपर भाषणात संस्थापक रघुनाथ वाघमारे यांनी टेंभुर्णी शहरासाठी बहुउद्देशीय मैदानाची मागणी करून जागेचा प्रश्न प्रकर्षाने मांडला .बहुजन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नागनाथ वाघमारे यांनी आभार मानले .विलास दोलतोडे ,राजाभाऊ पाटील व राजेंद्र मुळे यांनी सूत्रसंचालन केले. १५फेब्रुवारीपर्यंत चालनारे  महोत्सवासाठी योगेश दाखले, विकास सुर्वे, प्रमोद कांबळे ,झुंबर जाधव ,सागर कांबळे ,शमशुद्दीन मुलांनी ,सोमनाथ नलवडे, गणेश पोळ ,दशरथ कसबे, रणजित मोरे, सहादेव मोरे, आप्पाराव कसबे, हर्षल वाघमारे ,रोहन जगताप, उमेश जगताप अधि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

फेस्टीव्हलचे हे सलग सोळावे वर्ष आसून कुर्डूवाडी रोडलगत च्या खुल्या मैदानात आयोजित केला आहे हा कार्यक्र १५ फेब्रुवारी पर्यत चालणार आहे यामध्ये आकाश पाळणा,ब्रेकडान्स,सॕलाम्बो,पन्नालाल मिकीमाऊस आदी मनोरंजनपर साधने आहेत तर महिलांचे खरीदीसाठी विविध प्रकारचे ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत तर खवय्यासाठी चायनीज पावभाजी,भेळ,आईस्क्रीम,छोले भटोरे,दम बि-र्याणी,यासह अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.तर गायन स्पर्धा,डान्स स्पर्धा ढोलकी वादन,बासरी वादन आदी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकाचे वतीने करण्यात आले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

4 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

5 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

6 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

6 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

9 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

9 hours ago