शेतकर्‍यांनी आता मधमाशी पालनाकडे वळावेः आ. देशमुख

झुम कॉलद्वारे नाबार्ड, शेतकर्‍यांशी साधला संवाद
सोलापूर  : मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यांच्या परागभवनाच्या माध्यमातून पिकांचे उत्पादन वाढते. त्याचे शास्त्रीय पद्धतीने पालन केल्यास हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. त्याद्वारे लाखो रूपये कमवता येतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता मधमाशी पालनाच्या जोडव्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर सोशल फौंडेशन आणि नाबार्डचे पदाधिकारी आणि बागायतदारांची झुम कॉलद्वारे बैठक झाली, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यामध्ये नाबार्डचे प्रदीप बिले, प्रशांत सावंत, सारिका सातवडे, हणमंत कादे, मोहन आटंद यांच्यासह बागायदरांनी सहभाग नोंदवला.
मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे. शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा व्यवसाय करू शकतात. त्यांच्या परागभवनाच्या माध्यमातून पिकांचे उत्पादन वाढते. याशिवाय मधमाशापासून निघणारे मेण, मधही आर्थिक लाभ मिळवून देते. यापासून लाखो रूपये कमवता येतात. विशेष म्हणजे मधमाशी पालनासाठी खादी ग्रामोद्योगकडून अनुदानही मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांनी याचा विचार करावा. यावेळी प्रशांत सावंत आणि सारिका सातवडे, प्रदीप बिले यांनीही शेतकर्‍यांना मधमाशी पालनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

9 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

18 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

19 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

20 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

20 hours ago

धक्कादायक | ग्रामीण भागात 107 पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

MH 13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या…

21 hours ago