भवानी पेठ शिवसेना शाखेच्या वतीने जोडभावी पेठ पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

0
7

(वेब/टीम)

भवानी पेठ शिवसेना शाखेच्या वतीने जोडभावी पेठ पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारांचा सत्कार सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव शांतता व सु व्यवस्था राखून उत्सवात साजरा करण्यात उत्तम कामगिरी बजावल्या बद्दल महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) व विद्यार्थी सेनेचे नेते महेश (भैय्या) धाराशिवकर यांच्याहस्ते आणि उपशहर प्रमुख संताजी भोळे, विभाग प्रमुख शिवा ढोकळे, संतोष चौधरी, उपविभाग प्रमुख, विनायक पवार गुरूनाथ कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितित सत्कार करण्यात आला.
सन 2018 च्या सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा होण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उत्तम कामगिरी बजावल्या बद्दल भवानी पेठ शिवसेना शाखेच्या वतीने विभाग प्रमुख शिवा ढोकळे यांच्या पुढाकाराने जोडभावी पेठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री यशवंत केडगे, गुन्हेशाखेच्या वरीष्ठ निरीक्षक श्री भैरट साहेब, API म्हात्रे साहेब, API कटके साहेब, API राठोड साहेब आणि सर्व पोलिस कर्मचारांचा सत्कार फेटा बांधून आणि श्रीफळ देऊन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) आणि विद्यार्थी सेनेचे नेते महेश (भैय्या) धाराशिवकर यांच्या हस्ते फेटा बांधून हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआले़। जोडभावी पेठ पोलिस स्टेशन येथे भवानी पेठ शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी वरील मान्यवरांसह दिपक दुधाळे, नागेश हबीब, विनायक पवार, संतोष चौधरी, सलीम शेख, महेंद्र वनाने, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, गुरूनाथ कोळी यांच्यासह पोलिस शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here