यंदा ‘इलेक्ट्रो २०१९’ जुळे सोलापुरात ८फेब्रुवारी पासून

By-MH13 NEWS,वेब/टीम

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स,कॉम्प्यूटर,टेलिकम्युनिकेशन व होम अॅप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ” इलेक्ट्रो २०१९ ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत यंदा जुळे सोलापुरातील भंडारी क्लब मैदानावर आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष खुशाल देढीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या प्रदर्शनाचे सिस्को एलईडी हे मुख्य प्रायोजक आहेत.टीव्हीएस फायनान्स,नॅशनल इन्शुरन्स,हायर व शार्प हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार,दि. ८ फेब्रुवारी रोजी सायं ५  वा. सिस्का एलईडीचे मॅनेजींग डायरेक्टर गोवींद उत्तमचंदानी यांच्या हस्ते व रिलायन्स डिजीटल, डिस्ट्रीब्युशन बिझनेस,नॅशनल सेल्स हेड,कॉनरेड सेरीओ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन जितेंद्र राठी यांनी सांगितले.
६ दिवस चालणाऱ्या ‘ इलेक्ट्रो ‘या प्रदर्शनाचे हे २० वे वर्ष आहे.सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची प्रतिक्षा करीत असतात.दररोज दु .४ ते रात्री ९.३० व रविवारी स. ११ ते रात्री ९ .३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी,एलईडी,कलर टिव्ही,फ्रिज,साईड बाय साईड फ्रिज,एअर कंडीशनर,म्युझिक सिस्टीम,वॉशिंग मशीन,डिश टिव्ही,मायक्रोव्हेव ओव्हन,व्हॅक्यूम क्लिनर, सोलर सिस्टीम,गॅस गिझर,मोबाईल,आयपॅड,टेलीफोन,हैल्थ इक्वीपमेंट,मिक्सर,फुड प्रोसेसर,आटा चक्की ,एअर कुलर,वॉटर प्युरीफायर,स्टॅबीलायझर ,कॉम्प्युटर,कॉम्प्युटरला लागणारी उपकरणे इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात .ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात.टीव्हीएस फायनान्स ,बजाज फायनान्स,एचडीबी आणि एचडीएफसी फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते . ‘ सेडा ‘ तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०१८ ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.यावर्षी स्टॉलचे बुकींग ४०० पर्यंत पोहोचले आहे.जवळपास दीड लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील,असा अंदाज आहे.या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय,तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे.भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉद्वारे विविध आकर्षक बक्षिसे दिली जातात.इलेक्ट्रो २०१९ मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी स्टॉल धारकांद्वारे मारुती अल्टो कार बंपर ड्रॉद्वारे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.सर्व स्टॉलमध्ये जवळपास ४०० एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे.हे प्रदर्शनाचे संपूर्ण संयोजनासाठी सेडाद्वारे विशेष समिती कार्यरत आहे.

यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण,नाविण्यपूर्ण आणि सुविध्यपूर्ण असणार आहे.स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोई उपलब्ध करण्यात येणार आहेत.यामध्ये विविध प्रकारचे कारंजे,धबधबे,खवय्यांसाठी फूड कोर्ट,लहान मुलांसाठी किडस् झोन इ.सोयी असणार आहेत. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदानावर मॅटींगची व्यवस्था करण्यात आली आहे,असे सेडाचे अध्यक्ष खुशाल देढीया यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार आहे.त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे.प्रेक्षक आणि स्टॉलधारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड आणि सिक्युरिटी गार्डस् ही नेमण्यात आले आहेत. सेडातर्फे प्रदर्शनादरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे.संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल,यावर संपूर्ण कटाक्ष आहे.
प्रर्दशनासाठी प्रशस्त पार्किंगची सोय व माहितीसाठी वेगवेगळ्या काऊंटरची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही खुशाल देढीया यांनी सांगितले.
सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत आहेत.त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते.कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात.या प्रदर्शनातही ४ स्टॉल्स् सामाजिक संस्थांना उपलब्ध करुन देण्यात असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेस इलेक्ट्रोचे चेअरमन जितेंद्र राठी,उपाध्यक्ष ईश्वर मालू ,सचिव सुरजरतन धुत,सहसचिव आनंद येमुल,खजिनदार भुषण भुतडा यांच्यासह संचालक शिवप्रकाश चव्हाण,सुयोग कालाणी,सुर्यकांत कुलकर्णी,विजय गोसकी,आनंद मनवाणी तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह,आनंदराज दोशी,दिलीप राऊत,दिपक मुनोत, विपीन कुलकर्णी,कौशिक शाह आदी उपस्थित होते.

ऑनलाईन टिकीट विक्री

यंदाही ऑनलाईन तिकिट मिळण्याची सोय करण्यात येणार असून ग्राहकांना पेटीएमद्वारे प्राप्त करता येणार आहे, यामुळे नागरिकांना रांगेत उभारण्याची गरज लागणार नाही.मिस्ड कॉलद्वारे जाणा, दररोजचे अपडेटस् – ग्राहकांच्या सेवेसाठी ०८०३०६३६५६५ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास इलेक्ट्रो २०१९ चे अपडेटस् व आकर्षक भेट वस्तु देण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष खुशाल देढीया यांनी सांगितले.

MH13 News

Recent Posts

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

45 mins ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

15 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

15 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

19 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

20 hours ago

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17…

20 hours ago