घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network

कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील ‘अनलॉक वन’ ची सुरुवात केली. राज्यातील इतर शहरात किरकोळ मद्य विक्री सुरू होत असताना सोलापुरात पण दारू विक्री सुरू होईल अशी आशा मद्य प्रेमींना होती. शहरात वेगानं वाढणारी संसर्गित रुग्णांची संख्या त्यामुळे शहरात दारू विक्री होणार नाही परंतु ग्रामीण भागात तरी दारू मिळू शकेल आणि घसा ओला होईल अशी आशा धरून बसलेल्या दारू प्रेमींची मोठी निराशा झाली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील मद्य  विक्रीबाबत आदेश काढला असून पुढील आदेश होईपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य विक्री, बिअर बार ,परमिट रूम बंद राहणार आहेत. सोलापूरच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात मद्यविक्री सुरू होती.

राज्यातील अनेक मोठ्या शहरात घरपोच मद्यविक्री सुरू आहे.  शहराच्या तुलनेने ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. सरकार अनेक व्यवसाय अनलॉक करून दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश पारित करत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील परमिट रूम, बियर बार, वाईन शॉप,बियर शॉपी सुरू होतील अशी आशा तळीरामांना होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून सोलापूर जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री बंदच राहणार असल्याचा आदेश लागू केला आहे त्यामुळे तळीरामांची मोठी निराशा झाली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago