Categories: सामाजिक

अक्कलकोट तालुक्यात वाढल्या दुष्काळ झळा.!

धोंडप्पा नंदे,MH13NEWS

वागदरी सह अक्कलकोट तालुक्यात तीव्र दुष्काळ झळा बसत आहेत.सलग दोन वर्षे अत्यल्प पाऊस झाल्याने चारापिकांची,पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यातील बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भंटकती करावे लागत आहे तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारापाण्याची समस्याही गंभीर प्रश्न म्हणून उभा राहिला आहे अनेक गावांचे जलस्रोत आटल्याने पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला यामुळे शेतकरी चिंतेत आहे
अक्कलकोट तालुका कायमच दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र व कर्नाटक सिमेलगताचा दुष्काळ आता जणू अक्कलकोट तालुक्याच्या पाचवीलाच पुजला आहे असे वाटते.!
दुष्काळाची अंमलबजावणी नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल शासनाने दुष्काळ जाहीर केला.तरी सुद्धा शासनाने या जाहीर केलेल्या दुष्काळावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आज ग्रामीण भागामध्ये अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. एकीकडे विहिरी कोरड्या ठणठणीत पडले असून बोअरच्या पाण्याने तळ गाठले आहेत. अशातच तर जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाण्याची चणचण भासत आहे. ठराविक ठिकाणी टँकरची सोय झालेली असून बरेच ठिकाणी टँकरची सोय झालेली नाही, वाड्या-वस्त्यांवर तर अतिशय बिकट अवस्था झाली आहे. शासनाने नुसती आश्वासने देणे हे एकच काम करत आहे अंमलबजावणी माञ होत नाही
आज चाऱ्याची टंचाई भासत असताना शासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, एकीकडे शेतकऱ्यांमधून चारा डेपो किंवा चारा छावण्यांची मागणी होत असताना शासन मात्र या ठिकाणी डोळेझाक करताना दिसत आहे. आज दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची अवस्था इतकी भीषण आणि इतकी वाईट झालेली आहे, त्यांना जनावरांना पाणी सुद्धा नाही. कत्तलखान्याकडे कवडीमोल किमतीने जनावरे विकण्याशिवाय त्यांना पर्यायच उरला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे शासन जर लक्ष देत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होईल. आता उन्हाची दाहकता वाढत असून आणखी वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे याची शासनाला सुद्धा जाणीव आहे का..!
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट सह महाराष्ट्र कर्नाटक सिमेलगचा भाग वाचविण्यासाठी संवेदनशीलपणे विचार करण्याची गरज आहे. तातडीचे उपाय म्हणून अक्कलकोट तालुक्याचा हक्काचे पाणी मिळणे असेल, चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, कर्जबाजारी शेतकऱ्यांना जगण्याची आशा निर्माण करणारी मदत असेल तर दीर्घकालीन नियोजनात जलसंधारण, कृषी उत्पादनांच्या विपणनाचा विचार, कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांचा विचार करण्याची गरज आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

3 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

4 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

4 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

5 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

7 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

8 hours ago