Categories: राजकीय

सत्तेचा हव्यास असलेल्यांना थारा देऊ नका ; प्रणिती शिंदे

सोलापूर :- शहर मध्य मतदारसंघातील अनेक उमेदवार हे सत्ता, पदाच्या हव्यासापोटी निवडणूक लढवित आहेत. केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी ते निवडणूक लढत असून त्यांचे लोकांसाठी काहीच काम नाही, अशांना या निवडणुकीत जनतेने थारा देऊ नये, असे आवाहन काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी पाथरुट चौकातील मातंग वस्ती येथील कॉर्नर बैठकीत केले.

यावेळी शंभू डुकरे, शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, संजू साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ. प्रणितीताई पुढे म्हणाल्या की, या निवडणुकीतील लढाई ही जात,पात व धर्मविरोधातील आहे. आपल्याला या गोष्टींना छेद देऊन लोकशाही मजबूत करावयाची आहे. या सत्याच्या लढाईत लोकांसाठी काहीच काम न करणारे कमकुमव लोक एका महिलेविरोधात उभे आहेत. स्वत:चा मतदारसंघ सोडून ते दुसर्‍यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत.

माझे शिक्षण संस्था वा कारखाने नाहीत. केवळ जनसेवेचा वसा घेऊन मी काम करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक मतदारांनी गांभीर्याने घेऊन काम करणार्‍यांच निवडून द्यावे, असे आवाहन आ. प्रणितीताई यांनी केले. बैठकीला दत्ता कांबळे, विकी साठे, संतोष क्षीरसागर, किसन सकट, विलास उडाणशिव, बाळू गायकवाड, राजू प्याटी आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

46 mins ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

15 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

16 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

19 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

20 hours ago

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17…

20 hours ago