MH13 NEWS Network
उद्योगांचे विकेंद्रीकरण करून सोलापूरचा विकास होण्यासाठी केल्या मागण्या
औद्योगिक कॉरिडोर क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागातील उद्योगांचे विकेंद्रीकरण केले जावे. सोलापूर जिल्हा त्यास सक्षम पर्याय असून सोलापूरमध्ये निर्यात केंद्र उभे करण्याची मागणी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींनी केली. तसेच गरिबांचे हाल थांबण्यासाठी विस्कळीत असलेला धान्य पुरवठा आणखी सुलभ होण्याची मागणी खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी केली.
रविवारी दुपारी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, जल संसाधन व संसदीय कार्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे आदींसह महाराष्ट्र राज्यातील खासदार यांच्या संवाद सेतू या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती संदर्भात चर्चा झाली. याप्रसंगी सोलापूरची एकूण परिस्थिती, केलेली उपाय योजन सांगत भविष्यातील सोलापूर जिल्ह्यातील आशादायी मुद्द्यांवर खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींनी विविध मुद्दे मांडत मागण्या केल्या.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना पाय पसरट असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी जनतेला आवाहन करून दक्षता घ्याण्यासाठी विनंती केली. धान्यांसह मास्क आदी किट वाटप केले. वैद्यकीय यंत्रणा सक्षम असून आणखी व्हेंटिलेटर केंद्राकडून मिळावेत अशी मागणी केली. सोलापूर जिल्ह्यात कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने शिधा पत्रिका नसलेल्या गरिबांना धान्य मिळण्यासाठी निर्णय घेण्यात यावेत. त्यांची उपासमार न होता सुलभ धान्य मिळावे असेही खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी म्हणाले.
मेट्रो शहरांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथील उद्योगांचे विकेंद्रीकरण करून तेथील उत्पादन आधारित उद्योगांवर भर देत सोलापूरसह अनेक जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चोहो बाजूने राष्ट्रीय महामार्ग असल्याने सोलापुरात निर्यात केंद्र उभे करण्याची मागणी यावेळी केली. बोरामणी येथे प्रलंबित कार्गो विमानतळाचा प्रश्न सोडवून सोलापूर जिल्हा उद्योगाचा हब म्हणून विकसित व्हावा. यामुळे शेतकरी, लघु उद्योजकांना लाभ मिळेल. डाळिंब, द्राक्ष, केळी, साखर, भाजीपाला सहित आदी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळेल.
सोलापूर शहरात कोरोना अधिक असून ग्रामीण भागांमध्ये अधिक दक्षता घेतली जात असल्याची माहिती यावेळी दिली. विशेषतः हरिद्वार येथे अडकलेले भाविक, कोटा, उदयपुर, जोधपूर अशा भागात अडकलेल्या सोलापूरकरांना तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे उत्तर मिळाले आहे .
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…