‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network

देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी

शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली भेट
सोलापूर, दि.31:- शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधील बंदी आणि कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.

सोलापूर कारागृहातील 25 न्यायाधीन बंदीवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. या सर्वासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलीच्या शासकीय वसतिगृहात खास कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका पी. शिव.शंकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कारागृह अधीक्षक दिगंबर इगवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता संभाजी धोत्रे, महानगरपालिकेचे नगर नियोजन अभियंता महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, कारागृहातील इतर बंदीना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी 25 बंदीना स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ‘कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. येथे आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेतर्फे उपचार सुरु आहेत.
श्री. संतोष शेलार यांनी याच परिसरात अशा प्रकारच्या तीन इमारती आहेत. त्यामुळे त्यामध्ये दीडशे लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याात येऊ शकते असे सांगितले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

22 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

23 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago