जोश | ‘या’ आमदाराने गरजूंना दिली अशीही एनर्जी..!

लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते  शहर आणि ग्रामीण भागात  रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्‍या सुमारे 38 हजार पॅकेट एनर्जी ज्यूसचे वाटप करण्यात आले.
आ. सुभाष देशमुख यांनी विजापूर रोडवरील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड केटरिंग टेक्स्टाईल येथील कोविड सेंटर, वैंशपायन स्मृति महाविद्यालय, सिव्हील हॉस्पिटल, दक्षिण तालुक्यातील होटगी, औराद, मंद्रुप, भंडारकवठे, कंदल गाव येथील आरोग्य केंद्रला भेट दिली तसेच रेल्वे स्टेशन येथील माथाडी कामगारांची विचारपूस केली.
या सर्व ठिकाणासह शहरातील सर्व प्रभागात एनर्जी ज्यूसचे वाटप केले. आगामी काळात आणखी एनर्जी ज्यूसचे वाटप करण्यात येईल, असे आ. देशमुख यांनी सांगितले.  यावेळी आ. देशमुख यांनी  विजापूर रोड येथील कोविड सेंटर, आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांकडून तेथे असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेत अडचणी जाणून घेतल्या. रूग्णांना सर्व प्रकारचे उपचार आणि सुविधा योग्य पुरवाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. माथाडी कामगारांनी आ. देशमुख यांच्याकडे विमा सुरक्षा कवच द्यावे आणि दोन हजार रूपये अनुदान देण्याची मागणी केली. कामगारांचे प्रश्‍न मागणी लावण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. देशमुख यांनी यावेळी दिली.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago